पाणी टंचाईग्रस्त वाड्या/वस्त्या

मुख्य भौतिक गुंतवणूकीअंतर्गत टंचाईग्रस्त गावे / वाड्या

राज्यातील 12 जिल्ह्यामध्ये निवडण्यात आलेल्या टंचाईग्रस्त गावे / वाड्यात दरवर्षी राज्यातील काही गावे / वाड्यांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाई निर्माण होते अशा गावे / वाड्यांना जवळपास पिण्याच्या पाण्याचे शाश्वत स्त्रोत उपलब्ध नसल्याने कायमस्वरुपी नळ पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करणे हे दरडोई भांडवली खर्च व देखभाल दुरुस्ती खर्च परवडत नसल्याकारणाने अशा सातत्याने टंचाईग्रस्त असणाऱ्या गावे / वाड्यांसाठी पाऊस पाणी संकलन टाकी अथवा इतर तांत्रिक पर्याय उपलब्ध करुन उन्हाळ्यातील 3 महिन्यासाठी पाणी पुरवठा उपाययोजना निर्माण करणे. यासाठी राज्यातील 12 जिल्ह्यातील 500 पेक्षा कमी लोकसंख्येची 102 गावे / वाड्या निवडण्यात आल्या आहेत.