राज्यस्तरीय तांत्रिक समिती

राज्यस्तरीय तांत्रिक समिती

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उच्च दर्जाच्या, गुणवत्तापूर्ण तसेच शाश्वत पाणी पुरवठा व स्वच्छता सुविधा यशस्वीरित्या राबविण्याकरिता तांत्रिक बाबींविषयक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समिती गठीत करण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय क्र. जस्वका-0515 / प्र. क्र.85 / विसंक (तां) / पापु-11, दि. 4 जून, 2015 अन्वये निर्गमित करण्यात आला आहे.

समितीची रचना

1 उप सचिव तथा प्रकल्प संचालक, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अध्यक्ष
2 प्रकल्प व्यवस्थापक, सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य
3 अधीक्षक अभियंता, विशेष संनियंत्रण कक्ष, सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य
4 अधीक्षक अभियंता, मुख्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य
5 अधीक्षक अभियंता, गुणवत्ता नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य
6 अधीक्षक अभियंता, मित्रा, नाशिक सदस्य
7 कार्यकारी अभियंता, सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य
8 उप संचालक (जलस्वराज्य-2), भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा सदस्य
9 उप अभियंता, सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य सचिव
10 अशासकीय तांत्रिक सल्लागार सदस्य

राज्यस्तरीय तांत्रिक समितीची कर्तव्ये व जबाबदाऱ्या

  • जलस्वराज्य-2 कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता सुविधांचे नियोजन व अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे.
  • जलस्वराज्य-2 कार्यक्रमांतर्गत गुणवत्तापूर्ण तसेच शाश्वत पाणी पुरवठा व स्वच्छता सुविधा यशस्वीरित्या राबविण्याकरिता तांत्रिक बाबींविषयक धोरणात्मक निर्णय घेणे.
  • अत्याधुनिक तंत्रज्ञान व पा.पु.व स्व. उपाययोजनांसाठी वापरण्यात येणारे साहित्य इ. ची निवड सूची तयार करणे.
  • निमशहरी गावे / वाड्यांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांची प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया यांबाबत फेरविचार करणे.