राज्यस्तरीय प्रकल्प प्रस्ताव पडताळणी समिती

राज्यस्तरीय पडताळणी समिती

शहरालगतच्या भागातील पाणी पुरवठा योजनांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांची पूर्व पडताळणी करण्यासाठी राज्यस्तरीय पूर्व पडताळणी समिती गठित करण्यात आली आहे.

समितीची रचना

१  प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अध्यक्ष
सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य
३  उपसचिव तथा प्रकल्प संचालक, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सदस्य
प्रादेशिक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य
प्रकल्प व्यवस्थापक, सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आमंत्रित सदस्य
प्रादेशिक अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आमंत्रित सदस्य
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आमंत्रित सदस्य
अधीक्षक अभियंता, विशेष संनियंत्रण कक्ष, सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य सचिव

राज्यस्तरीय पडताळणी समितीची कर्तव्ये व जबाबदाऱ्या

  • संचालक (तांत्रिक), म. जी. प्रा. यांचे अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पडताळणी उप समितीने तांत्रिकदृष्ट्या तपासणी करुन अंतिम केलेल्या योजनांना तत्वत: मान्यता देणे.
  • तत्वत: मान्यता दिलेल्या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी शिफारस करणे. 

राज्यस्तरीय पडताळणी उप समिती

शहरालगतच्या भागातील पाणी पुरवठा योजनांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय पडताळणी उप समिती गठीत करण्यात आली आहे. 

समितीची रचना

संचालक (तांत्रिक), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई अध्यक्ष
अधीक्षक अभियंता (विशेष संनियंत्रण कक्ष), सु. स.व प्र. व्य. कक्ष, नवी मुंबई  सदस्य
अधीक्षक अभियंता (मुख्यालय), म. जी. प्रा., मुंबई सदस्य
अधीक्षक अभियंता (यांत्रिकी), म. जी. प्रा., ठाणे सदस्य
वित्त नियंत्रक, सु. स. व प्र. व्य. कक्ष, नवी मुंबई सदस्य
कार्यकारी अभियंता, म. जी. प्रा., औरंगाबाद सदस्य
कार्यकारी अभियंता, सु. स. व प्र. व्य. कक्ष, नवी मुंबई सदस्य सचिव

राज्यस्तरीय पडताळणी उप समितीची कर्तव्ये व जबाबदाऱ्या

  •  जलस्वराज्य-2 कार्यक्रमांतर्गत शहरालगतच्या गावे / वाड्यांमधील योजनांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करणे. 
  •  त्रुटी असलेल्या अहवालांची संबंधित यंत्रणेकडून पूर्तता करुन घेणे.
  •  तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय पडताळणी समितीकडे तत्वत: मान्यतेसाठी सादर करणे.