राज्यस्तरीय प्रकल्प समन्वय समिती

राज्यस्तरीय प्रकल्प समन्वय समिती

जलस्वराज्य-2 कार्यक्रमांतर्गत विविध यंत्रणांमध्ये नियमितपणे समन्वय साधण्यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्षाच्या सहाय्याने सदर समिती कार्यरत राहिल.

समितीची रचना

1 प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अध्यक्ष
2 प्रकल्प व्यवस्थापक, सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य
3 अतिरिक्त संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा सदस्य
4 अधीक्षक अभियंता, विशेष संनियंत्रण कक्ष, सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य
5 संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था सदस्य
6 अतिरिक्त संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था सदस्य
7 क्षमता बांधणी तज्ञ, सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य
8 वित्त नियंत्रक, सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य
9 कार्यकारी अभियंता, सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य
10 उप संचालक, आरोग्य सेवा संचालनालय सदस्य
11 संनियंत्रण व मूल्यमापन तज्ञ, सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य
12 अवर सचिव (पापु-11), सु. स. व प्र. व्य. कक्ष सदस्य सचिव

राज्यस्तरीय प्रकल्प समन्वय समितीची कर्तव्ये व जबाबदाऱ्या

  • जलस्वराज्य-2 कार्यक्रम अधिक परिणामकारकरित्या राबविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच इतर शासकीय विभागांबरोबर समन्वय साधणे.
  • या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या आर्थिक बाबींचा आढावा
  • विविध जिल्हास्तरीय यंत्रणांमध्ये समन्वय साधणे.
  • प्रकल्प चमूस मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी निर्देश देणे.
  • या कार्यक्रमांतर्गत माहिती, शिक्षण व संवाद तसेच क्षमता बांधणी अंतर्गत विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेणे.
  • संनियंत्रण व मूल्यमापन प्रणाली तसेच व्यवस्थापन माहिती प्रणाली अंतर्गत विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेणे.
  • प्रकल्प चमूस कार्यक्रम राबविण्यास सल्ला देणे.