शक्ती प्रदान समिती

शक्तिप्रदान समिति

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील बाह्य सहाय्यीत ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता प्रकलपाांची अंमलबजावणी शीघ्र गतीने व्हावी, या करिता शासन निर्णय क्र. जस्वप्र-2004/प्र.क्र.3835/पापु-11, दिनांक 07 जून, 2004 नुसार शक्ती प्रदान समिती गठीत करण्यात आली आहे.

शक्तिप्रदान समिति रचना

1. प्रधान सचिव , (व्यय) वित्त अध्यक्ष
2. प्रधान सचिव/ अतिरिक्त मुख्य सचिव,नियोजन सदस्य
3. प्रधान सचिव,पाणी पुरवठा व स्वछता विभाग सदस्य
4. प्रधान सचिव, ग्रामीण विकास विभाग सदस्य
5. प्रधान सचिव,आदिवासी विकास विभाग सदस्य
6. सचिव,बांधकाम विभाग सदस्य
7. सदस्य सचिव,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य
8. संचालक (आर.एस.पि.एम.यू)आणि उप सचिव / सह पाणी पुरवठा आणि स्वछता विभाग सदस्य सचिव

 

शक्ति प्रदान समितीच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या

शक्ती प्रदान समितीला बाह्य सहाय्यीत प्रकल्पांचे, फक्त शासन कार्यनियमावली (Rules of Business) प्रमाणे ज्या विषयाबाबतचे निर्णय मंत्रिमंडळानेच घ्यावयाचे आहेत ते सोडून, शासनाचे इतर सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत.