धोरणे आणि अस्वीकार

जलद जोडण्याविषयीची धोरणे

बाह्य संकेतस्थळे / पोर्टल्सशी असलेल्या जोडण्या
या पोर्टलवर अनेक ठिकाणी तुम्हाला अन्य संकेत स्थळे / पोर्टल यांच्या जोडण्या दिसतील. यांची निर्मिती इतर शासकीय, अशासकीय / खाजगी संस्थांमार्फत केलेली आहे. या जोडण्या तुमच्या सोईसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. जोडणीची निवड केल्यावर तुम्ही त्या संकेतस्थळामध्ये संचार करू शकता.  जेव्हा तुम्ही बाह्य जोडणीची निवड करता , तेव्हा तुम्ही जलस्वराज्य-2 कार्यक्रमाच्या संकेत स्थळावरून बाहेर पडता.  त्याचक्षणी  तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण त्याा बाह्य जोडणीच्या मालकाकडे/ प्रायोजकाकडे जाते. त्या संकेतस्थळावर तुम्ही त्या संकेतस्थळाच्या मालकाच्या / पुरस्कर्त्याच्या गोपनीयता आणि सुरक्षेच्या धोरणांच्या अधीन असाल. जोडणीवरील संकेतस्थळाच्या मजकूरासाठी आणि विश्वसनीयतेबाबत जलस्वराज्य-2 कार्यक्रम, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जबाबदार असणार नाही आणि त्यामधील हेतुबाबत अनावश्यक पुष्टीही देणार नाही. केवळ ही जोडणी असण्याबाबतचे किंवा या पोर्टलवरील यादीमधील तिचा समावेश हा कोणत्याही प्रकारच्या पृष्ठांकनासाठी गृहित धरला जाऊ नये.

 

इतर संकेत स्थळांव्दारे/पोर्टलद्वारे  जलस्वराज्य-2 कार्यक्रम संकेतस्थळाशी लिंक 
आमच्या स्थळावर आयोजित केलेली माहिती तुम्ही थेट जोडणीद्वारे घेण्याविषयी आमची कोणतीही हरकत नाही आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेत स्थळावरील चौकटींमध्ये आमची पृष्ठे भरण्यासाठी आम्ही अनुमती देऊ शकत नाही. आमच्या विभागाची पृष्ठे ही केवळ वापरकर्त्याच्या नव्याने उघडण्यात आलेल्या ब्राऊझरच्या चौकटीमध्येच उघडायला हवी.

गोपनीयता धोरण

सर्वसाधारण नियमानुसार, हे पोर्टल तुमच्याकडून तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे की, नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-टपालाचा पत्ता)  स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. हे पोर्टल तुमच्या भेटीचा अभिलेख ठेवते आणि सांख्यिकीय कारणासाठी पुढील माहितीची जसे की, आंतरजाल नियमावली (आयपी) पत्ते, अधिक्षेत्राचे नाव, ब्राऊझरचा प्रकार, कार्यप्रणाली, भेट दिल्याची तारीख व वेळ आणि भेट दिलेली पृष्ठे यांची नोंद करते. आम्ही या माहितीचा उपयोग तुमच्या वैयक्तिक भेटीची ओळख म्हणून ठेवत नाही.
या संकेत स्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो. आम्ही उपयोगकर्ता किवा त्यांच्या ब्राउजिंग गतीविधीवर लक्ष ठेवत नाही.
जलस्वराज्य-2 कार्यक्रम संकेतस्थळाने तुमच्याकडे वैयक्तिक माहिती पुरविण्याची विनंती केल्यास आणि तुम्ही ती देणे पसंत केल्यास ती कशाप्रकारे वापरली जाईल याची माहिती तुम्हाला दिली जाईल आणि तुमच्या वैयक्तिक माहितीचे गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी सुरक्षा प्रमाणके आचरली जातील.

स्वामित्व हक्क धोरण

या पोर्टलवरील वैशिष्ट्यपूर्ण साहित्य विनाशुल्काने, कोणत्याही स्वरूपात किंवा माध्यमात विनिर्दिष्ट परवानगीच्या आवश्यकतेशिवाय उद्धृत करता येईल. साहित्य अचूकपणे उद्धृत करण्यावर आणि अप्रतिष्ठाकारक रितीचा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदर्भाचा वापर न करण्यावर हे अवलंबून आहे. जेथे साहित्य प्रकाशित करावयाचे असेल किंवा इतरांना निर्गमित करावयाचे असेल तेथे स्त्रोतास ठळकपणे आभिस्वीकृत करणे आवश्यक आहे. तथापि त्रयस्थाचा स्वामित्व हक्क असलेले साहित्य अशी या स्थळावर ओळख पटविण्यात आलेल्या अशा कोणत्याही साहित्याच्या उद्धृतीकरणाचे प्राधिकारपत्र संबंधित स्वामित्व हक्क धारण करणाऱ्याकडून प्राप्त करण्यात यावे.

उत्तरदायित्त्वास नकार

या संकेतस्थळावर उपलब्ध माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करुन देण्यात आला असला तरी या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी जलस्वराज्य-2 कार्यक्रम, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन स्वीकारत नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती अथवा संभ्रम आढळल्यास वापरकर्त्याने तपशीलवार स्पष्टीकरणासाठी  जलस्वराज्य-2 कार्यक्रम, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या संबंधित विभागाशी/अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

अटी आणि शर्ती

या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल जलस्वराज्य-2 कार्यक्रम, पाणी पुरवठा व स्वच्छता  विभागामार्फत केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती जलस्वराज्य-2 कार्यक्रम विभागाने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका.
संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा.
या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास जलस्वराज्य-2 कार्यक्रम, पाणी पुरवठा व स्वच्छता  विभाग, महाराष्ट्र शासन त्यासाठी जबाबदार राहणार नाही.
या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन जलस्वराज्य-2 कार्यक्रम या जोडण्या उपलब्ध करून देत आहे.
भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.

 

मजकूर लेखन, नियमन आणि मंजुरी धोरण

मजकूर लेखन, नियमन आणि मंजुरी धोरण

वेब मजकूर आढावा धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन

मजकूर पुराभिलेख संबंधी धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन
अधिक मजकूर पुराभिलेख संबंधी धोरण

संकेतस्थळ सुरक्षा धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन
अधिक संकेतस्थळ सुरक्षा धोरण

संकेतस्थळ संनियंत्रण धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन
अधिक संकेतस्थळ संनियंत्रण धोरण

आकस्मिकता व्यवस्थापन

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन
अधिक आकस्मिकता व्यवस्थापन